लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 01:47 PM2017-09-27T13:47:51+5:302017-09-27T14:04:01+5:30

स्वाभिनमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  

Hanuman sent to Lanka, dropped the tail and stayed with them - Raju Shetti's government | लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

Next

औरंगाबाद - स्वाभिमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर निशाना साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची तर सदाभाऊ खोत यांना हनुमानाची उपमा दिली. यावेळी त्यांनी नाव न घेता सहाभाऊ खोत यांच्यावर टीका केली ते म्हणाले की, आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. कर्जमाफीचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नाही,  शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. राज्य सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली.  सप्टेंबरच्या सुरुवातीला राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुम राज्य सरकारला धारेवर धरत टीका केली. 

कर्जमाफीचे पैसे देण्यास जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले होते की, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ. 

 

Web Title: Hanuman sent to Lanka, dropped the tail and stayed with them - Raju Shetti's government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.