आनंदाचे गुणोत्तर...

By admin | Published: January 4, 2015 01:58 AM2015-01-04T01:58:43+5:302015-01-04T01:58:43+5:30

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो;

Happiness ratio ... | आनंदाचे गुणोत्तर...

आनंदाचे गुणोत्तर...

Next

मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो; आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन.
माझा जन्म पुणे येथील नारायणगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच मी अभ्यासात हुशार होतो. अगदी शाळेतही पहिला क्रमांकच असायचा. दहावी आणि बारावीलाही मेरिटमध्ये होतो. शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. आमच्या नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलनही मोठ्या थाटात व्हायचे. त्यात मी अनेक नाटकांत भाग घेत असे. तेव्हापासूनच ठरवले होते मोठे होऊन अभिनेता व्हायचे, मात्र सामान्य कुटुंबाच्या विचारप्रणालीप्रमाणे मलाही आई-बाबांकडून सांगण्यात आले, ‘तुला तुझ्या उदरनिर्वाहासाठी पदवी शिक्षण घ्यावेच लागेच. शिक्षण नसेल तर कोणीच तुला विचारणार नाही.’ त्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यकच झाले.
माझ्या आयुष्याला यूटर्न मिळाला तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असताना. मला सूत्रसंचालन करायला मिळाले. केईएम मेडिकल कॉलेजमध्ये असताना आम्ही ‘अपूर्वाई’ नावाचा डान्स ड्रामा केला. त्या वेळेस मिळणारा आनंद मला सांगून गेला की ‘बॉस, दिस इज द टाइम. तुला आता यात वळायलाच पाहिजे.’ माझ्या आयुष्यात या वेळी अशी दोन माणसे आली ज्यांनी आयुष्याची दिशाच बदलली. त्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवी बापट आणि सुबल सरकार. बापट सरांनी मला आयुष्य किती अफाट असू शकते ते दाखवले. कारण आपण एका चाकोरीपद्धतीच्या आयुष्यात जगत असतो, हे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे पाहून असे वाटायचे एकच माणून विविध क्षेत्रांत किती सहजतेने संचार करू शकतो. तर सुबलदांनी आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे शिकवले.
मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक गोल सेट केला आणि त्याप्रमाणे तो साध्य केला. मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, त्यानंतर अभिनय क्षेत्रात आलो आणि राजकारणात प्रवेश केला. ही तीनही क्षेत्रे आनंदाचे गुणोत्तर करणारी आहेत. मी डॉक्टर राहिलो असतो तर शेकडो लोकांना आनंद दिला असता. अभिनय क्षेत्रात लाखोंना आनंद देईन; मात्र राजकारणात राहून मी कोट्यवधी लोकांचे जीवन सुखी करू शकेन. शिवाय मी जो पक्ष स्वीकारला आहे त्याचे मराठी लोकांसाठी आणि समाजाचे भले करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याचा मीही सभासद झाल्याचा मला आनंद आहे. (शब्दांकन : सायली कडू)

मी बारावीला मेरिटमध्ये आलो. त्या वेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. गिरिश ओक, डॉ. शरद दुतवडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे अशा नामवंत कलाकारांचा माझ्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्या वयात मला असे वाटायचे की डॉक्टर झाल्यावर आपल्याला अभिनय क्षेत्रातही येता येते. हा गमतीचा भाग सोडला तर एक स्थैर्य देणारा व्यवसाय तसेच समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी पार पाडण्याची संधी मला वैद्यकीय क्षेत्रातच मिळणार होती. म्हणून मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रथिष्ठित ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मधून २००४ साली मी पदवीधर होऊन बाहेर पडलो.

पहिले दोन अंकी नाटक केईएममध्ये असताना ‘शांतीचं कार्ट चालू’ हे केले. त्यानंतर ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ आणि ‘अपूर्वाई’ केले. इथून सुरुवात झाली आणि सूत्रसंचालन केले. त्यानंतर पहिली मालिका ‘चार दिवस सासूचे’ केली. त्या वेळी मला पहिले व्यावसायिक नाटक ‘शंभूराजे’ करण्याची संधी मिळाली आणि एकावेळी पाच मालिका सोडून नाटकात रमलो. असा अभिनयातील करियरग्राफ हळूहळू उंचावतच गेला. माझा करियर ग्राफ थोडा वेगळ्या पद्धतीने झाला. आधी नाटक, मग मालिका नंतर चित्रपट. ‘शंभूराजे’नंतर ‘राजा शिवछत्रपती’ केले.

Web Title: Happiness ratio ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.