गणेशभक्तांना खूशखबर

By admin | Published: June 18, 2016 01:30 AM2016-06-18T01:30:59+5:302016-06-18T01:30:59+5:30

मुंबई, ठाणेहून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून १४२ गणपती विशेष ट्रेन (फेऱ्या) सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-करमाळी

Happy Ganesh devotees | गणेशभक्तांना खूशखबर

गणेशभक्तांना खूशखबर

Next

मुंबई : मुंबई, ठाणेहून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून १४२ गणपती विशेष ट्रेन (फेऱ्या) सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-करमाळी-सीएसटीदरम्यान ४0, सीएसटी-करमाळी-सीएसटीसाठी सहा, दादर-सावंतवाडी-दादरसाठी २२, पनवेल-चिपळूण-पनवेल डेमूच्या ३६, ट्रेन नंबर दादर-रत्नागिरी-दादरसाठी १०, ट्रेन नंबर एलटीटी-सावंतवाडी-एलटीटीदरम्यान २८ ट्रेनचा त्यात समावेश आहे. या सर्व फेऱ्यांच्या तिकीट आरक्षणाची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी (२८ फेऱ्या-आठवड्यातून तीन दिवस)
ट्रेन नंबर 0१0३७ एलटीटीहून २५ आॅगस्ट ते २४ सप्टेंबरपर्यंत सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी ५.३0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0३८ सावंतवाडी येथून २६ आॅगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी ६.४0 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी १८.३0 वाजता पोहोचेल.

सीएसटी-करमाळी-सीएसटी (४0 फेऱ्या - गुरुवार सोडता अन्य सहा दिवस धावेल)
ट्रेन नंबर 0१0२१ सीएसटीहून २७ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत 00.२0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १४.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0२२ करमाळी येथून १५.२५ वाजता सुटून सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ४.२५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, पेरणेम, थिवीम येथे थांबा असेल.

सीएसटी-करमाळी-सीएसटी (६ फेऱ्या-फक्त गुरुवारी धावेल)
ट्रेन नंबर 0१00३ सीएसटीहून १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत 00.४0 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १४.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00४ करमाळी येथून १५.२५ वाजता सुटेल आणि सीएसटी येथे दुसऱ्या दिवशी ४.२५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मदुरे, थिविम या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

दादर-सावंतवाडी-दादर (२२ फेऱ्या-आठवड्यातून तीन दिवस धावेल)
ट्रेन नंबर 0१0९५ दादर स्थानकातून २६ आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत रविवार, बुधवार आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे १९.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0९६ सावंतवाडी येथून २७ आॅगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी ४.५0 वाजता सुटून दादर येथे १६.00 वाजत पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप येथे थांबा देण्यात आला आहे.

दादर-रत्नागिरी-दादर (१0 फेऱ्या-आठवड्यातून एक दिवस)
ट्रेन नंबर 0१0८९ दादर येथून २६ आॅगस्ट ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी २१.४५ वाजता सुटून रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0९0 रत्नागिरी येथून २७ आॅगस्ट ते २४ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी ९.२0 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १६.४0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबा असेल.

पनवेल-चिपळूण-पनवेल डेमू (३६ फेऱ्या)
ट्रेन नंबर 0११0७ पनवेल येथून आॅगस्टच्या २९ ते ३१ आॅगस्टपर्यंत तसेच सप्टेंबर महिन्याच्या २,३,४,६,७,८,१0,११,१२,१४,१५,१६,१८,१९,२0 तारखेला ११.१0 वा. सुटेल आणि चिपळूण येथे १६.00 वा.त्याच दिवशी पोहोचेल. 0११0८ चिपळूण येथून त्याच तारखांना १७.३0 वा.सुटून पनवेलला २२.३0वा. पोहोचेल. या ट्रेनला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड, अंजनी स्थानकात थांबा असेल.

Web Title: Happy Ganesh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.