हॅप्पी मॅट्रीमोनी डे
By Admin | Published: April 14, 2016 11:51 AM2016-04-14T11:51:55+5:302016-04-14T11:51:55+5:30
आपण कुणावर प्रेम करत असू तर ते प्रेम व्यक्त करण्याचा १४ फेब्रुवारी हक्काचा दिवस आहे. प्रेमात पडल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा अधिकृत दिवस आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - आपण कुणावर प्रेम करत असू तर ते प्रेम व्यक्त करण्याचा १४ फेब्रुवारी हक्काचा दिवस आहे. प्रेमात पडल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा अधिकृत दिवस आहे. पण विवाहाचे काय ? विवाहासाठी पण असा एखादा अधिकृत दिवस असला पाहिजे.
म्हणून ऑनलाइन विवाह जुळवणा-या भारत मॅट्रीमोनी या आघाडीच्या संकेतस्थळाने १४ एप्रिल विवाह दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत मॅट्रीमोनीने विवाहइच्छुक जोडप्यांसाठी आजच्या दिवसासाठी काही खास ऑफर्स ठेवल्या आहेत.
विवाहाच्या सकारात्मक बाजू आणि वैवाहीक आयुष्यातील आनंदी क्षण साजरे करण्यासाठी भारत मॅट्रीमोनीकडून प्रोत्साहन दिले जात आहे.