मान्सूनचा सुखद सांगावा; ३० मे रोजी केरळात

By admin | Published: May 17, 2017 05:05 AM2017-05-17T05:05:57+5:302017-05-17T05:05:57+5:30

आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहात आहोत, तो मान्सून या वेळी दोन दिवस अगोदरच म्हणजे ३० मे रोजी केरळात दाखल होईल, असा सुखद अंदाज भारतीय हवामान विभागाने

Happy Monsoon; On May 30 in Kerala | मान्सूनचा सुखद सांगावा; ३० मे रोजी केरळात

मान्सूनचा सुखद सांगावा; ३० मे रोजी केरळात

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहात आहोत, तो मान्सून या वेळी दोन दिवस अगोदरच म्हणजे ३० मे रोजी केरळात दाखल होईल, असा सुखद अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. केरळात आल्यानंतर पुढील सात दिवसांत मान्सूनच्या धारा मऱ्हाटी मुलुखावर बरसायला लागतात.
दरवर्षी अंदमान, निकोबार द्वीपसमूह, बंगालचा उपसागरातील बहुतांशी भागांत मान्सूनचे २० मेपर्यंत आगमन होते़ यंदा
मात्र, तिथपर्यंत मान्सूनने आताच
मजल मारली आहे़ मान्सूनने मंगळवारी आणखी प्रगती करत संपूर्ण अंदमान बेटसमूह व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. तो यंदा लवकरच पोहोचेल. मान्सूनच्या पुढच्या प्रवासाला असेच पोषक वातावरण राहिले, तर मान्सून नियोजित वेळेत राज्यात दाखल होईल. प्रत्यक्ष केरळमध्ये दाखल हवामान विभागाचा अंदाज
वर्षदाखलअंदाज
२०१२५ जून१ जून
२०१३१ जून३ जून
२०१४६ जून५ जून
२०१५५ जून३० मे
२०१६८ जून७ जून

- हवामान विभागाने गेल्या १२ वर्षांत केरळमधील मान्सूनचा आगमनाचा व्यक्त केलेला अंदाज २००५ वगळता जवळपास बरोबर आला आहे़

Web Title: Happy Monsoon; On May 30 in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.