आमदारच करतो हप्तेबाजी

By admin | Published: November 9, 2015 09:14 PM2015-11-09T21:14:41+5:302015-11-09T23:30:23+5:30

जयेंद्र परूळेकर यांची टीका : लवकरच नावे उघड करण्याचा इशारा

HAPTABHAI does the MLA | आमदारच करतो हप्तेबाजी

आमदारच करतो हप्तेबाजी

Next

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असून, या अवैध धंदेवाल्यांकडून सत्ताधारी पक्षातील एक आमदार हप्ते घेत आहे. त्यांचे नाव आम्ही लवकरच उघड करू, असा इशारा कोणत्याही आमदाराचे नाव न घेता काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवडेकर, संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, अ‍ॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर म्हणाले, आचरा येथील मच्छिमारांचा विषय चिघळण्यास सत्ताधारीच जबाबदार असून, पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. जे आंदोलनकर्त्यांना पाठबळ देत होते. त्यांना अटक झाल्यानंतर पुढे पुढे करणारे पळून गेले, अशी टीका आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता डॉ. परूळेकर यांनी केली.राज्यात एकीकडे शिवसेना - भाजप पक्षातील नेते एकमेकांबरोबर भांडत आहेत आणि सत्तेचा उपभोगही घेत आहेत. आता जनतेनेच त्यांना योग्य तो धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री दीपक केसरकर हे मंत्री नसताना धान्य वाटत होते. पण आता मंत्री झाल्यावर त्यांना जनता का आठवत नाही? असा सणसणीत सवाल केला.शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचे मंत्रीपद केव्हा काढून घेतील हे सांगता येत नाही. जिल्ह््यात विकासनिधी आणण्यात अपयशी ठरलेले पालकमंत्री पाचशे कोटी आणल्याच्या वल्गना करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत नियोजनाचा निधी जिल्ह््याला मिळालेला नाही. मग पाचशे कोटी कसे आणणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले असून, या अवैध धंदेवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते एक सत्ताधारी आमदार घेत आहे. त्यात मंत्र्यांचीही भागिदारी असू शकते. मात्र, आम्ही त्या आमदाराचे नाव घेणार नाही. पत्रकारांनी आमदार शोधून काढावा. तसेच योग्य वेळ आल्यावर ते नाव आपण जाहीर करू, असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट.
सत्ताधारी पक्षातील आमदारावर नाव न घेता टीका.
आंदोलनकर्त्यांना सोडून नेते पळून गेल्याची टीका.
लवकरच नाव उघड करणार.

Web Title: HAPTABHAI does the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.