‘हर घर तिरंगा’ अभियान; डाक विभागाने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:10 AM2023-08-07T06:10:06+5:302023-08-07T06:10:13+5:30

स्वातंत्र्य दिनाची तयारी : पोस्ट कार्यालयातून होणार तिरंगा विक्री

'Har Ghar Triranga' Campaign; What a belt by the postal department | ‘हर घर तिरंगा’ अभियान; डाक विभागाने कसली कंबर

‘हर घर तिरंगा’ अभियान; डाक विभागाने कसली कंबर

googlenewsNext

- शैलेश कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू करण्यात आले. २०२२ मध्ये २३ कोटी  नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले. यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे.

 सेल्फी काढून अपलोड करता येणार फोटो... 
राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत, या उद्देशाने टपाल कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost4Tiranga, #HarDilTiranga. #HarGhar Tiranga या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.

 तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात संपर्क साधा... 
हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे. 
राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांत प्राप्त करू शकता.

Web Title: 'Har Ghar Triranga' Campaign; What a belt by the postal department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.