'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 07:36 PM2022-10-16T19:36:17+5:302022-10-16T19:49:16+5:30

'माझे मुंबईत शिवजयंतीचे कार्यक्रम होते, ते सगळे रद्द करुन शिवनेरीवर गेलो.'

Har Har Mahadev Movie | Raj Thackeray | 'I went to Shivneri, suddenly a hand came on my shoulder and...' Raj Thackeray told 'that' story | 'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

Next

मुंबई: अभिनेता सुबोध भावे लवकरच शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'हर हर महादेव' चित्रपटात दिसणार आहे. सुबोध शिवरायांच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने सुबोधने राज ठाकरेंची मुलाख घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी 1994चा शिवनेरीवरचा एक किस्सा सांगितला.

छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा

राज ठाकरे म्हणाले की, '1994चा घटना आहे, मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. 2-4 दिवसांत शिवजयंती होणार होती. मी माझ्या डायरीत शिवजयंतीचे कार्यक्रम लिहित बसलो होते. तेव्हा सामनाचे बाळासाहेब दांगट आले आणि म्हणाले, फार वर्षांपूर्वी बाळासाहेब शिवनेरीवर आले होते. त्यानंतर कोणताच ठाकरे किल्ल्यावर आला नाही, आता तुम्ही या. मी त्यांना नकार दिला, पण दुसऱ्या दिवशी का माहित नाही, पण सगळे कार्यक्रम रद्द केले आणि शिवनेरीवर गेलो.'

'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे

'सकाळी गडावर चढलो आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या ठिकाणी गेलो. तिथे एक अंधारी खोली आहे. मी तिथे भिंतीवर हळद-कुंकू टाकले आणि भिंतीकडे पाहत बसलो होतो. तेव्हा अचानक एक हात माझ्या खांद्यावर आला आणि आवाज आला की, इथेच महाराजांचा जन्म झाला आहे. मी मागे पाहिले, तर तिथे कोणीच नव्हते. मला काहीच सुधरलं नाही अन् मी बाहेर आलो. डोक्यावर पाणी टाकून नॉर्मला झालो. त्या दिवशी तिथ कोण होतं, मला काहीच माहित नाही. मी म्हणत नाही की ते महाराज होते. पण, कोण होतं ते मला माहित नाही. त्यानंतर अनेकदा शिवनेरीवर गेलो, पण तसा अनुभव कधी आला नाही.'
 

Web Title: Har Har Mahadev Movie | Raj Thackeray | 'I went to Shivneri, suddenly a hand came on my shoulder and...' Raj Thackeray told 'that' story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.