मोदींसाठी ‘हर हर...’मुळे हिंदू समाजाचा अपमान
By admin | Published: May 9, 2014 01:16 AM2014-05-09T01:16:54+5:302014-05-09T01:16:54+5:30
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी ‘हर हर... ’या शब्दांच्या प्रयोगाला भारत साधू समाजाने आक्षेप घेतला आहे.
वाराणशी : भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी ‘हर हर... ’या शब्दांच्या प्रयोगाला भारत साधू समाजाने आक्षेप घेतला आहे. अशाप्रकारच्या प्रचारामुळे हिंदू समाजाचा अपमान झाला असल्याचे मत साधू समाजाचे संस्थापक महामंत्री स्वामी हरिनारायणानन्द यांनी व्यक्त केले आहे. एका व्यक्तीने दोन ठिकाणांहून निवडणूक लढणे अयोग्य आहे व त्यावर बंदी लावण्याची गरज आहे. काही पक्षांनी वाराणशीतून दुसर्या प्रांतातील उमेदवार उभे केले आहेत. हादेखील येथील स्थानिक जनतेचा अपमान आहे. स्थानिक लोकांनी मतदान करताना याचा विचार करायला हवा असे ते म्हणाले. निवडणूकांदरम्यान राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून ज्याप्रकारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत, त्यामुळे वाराणशीसारख्या पवित्र नगराची पवित्रता, आध्यात्मिकता व येथील सात्विक वातावरण प्रदूषित होत आहे अशी टीकादेखील त्यांनी केली.