महिलांना मारहाण करून घरावर दरोडा

By admin | Published: September 6, 2015 02:11 AM2015-09-06T02:11:31+5:302015-09-06T02:11:31+5:30

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली.

Harassing women by assaulting women | महिलांना मारहाण करून घरावर दरोडा

महिलांना मारहाण करून घरावर दरोडा

Next

राजापूर/ जैतापूर : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली. या दरोड्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
भालावली गावातील रातांबा शेडवाडीत (रवीचा सडा) येथे बावधाने कुटुंब राहाते. त्यातील कुटुंबप्रमुख सीताराम पांडुरंग बावधाने हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. त्यांची पत्नी, दोन लहान मुली व नव्वद वर्षीय आई जनाबाई असे कुटुंबीय गावीच असते. एक बहीण शेजारी राहते. सीताराम व त्यांची पत्नी काही कामानिमित्त गावी गेले होते. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास तीन अज्ञात बुरखाधारी हातात सुरे घेऊन त्यांच्या घरात घुसले. त्यांनी प्रथम जनाबाई यांना दोरखंडाने बांधून त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. त्यावेळी जनाबाई यांची मुलगी आनंदी लक्ष्मण जांगले (५०) यांनी आरडाओरड करायला सुरुवात करताच त्यांनी आनंदी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्यांनाही दोरीने बांधले आणि धारदार सुरीने त्यांनी आनंदी यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर या चोरट्यांनी एका बंदिस्त खोलीचे कुलूप व कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाजामुळे शेजारी घराकडे येऊ लागले. त्यांची चाहूल लागताच तिन्ही बुरखाधाऱ्यांनी पलायन केले.

Web Title: Harassing women by assaulting women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.