हार्बर लाइन पुन्हा विस्कळीत

By admin | Published: March 12, 2015 05:16 AM2015-03-12T05:16:08+5:302015-03-12T05:16:08+5:30

उशिरा धावणाऱ्या लोकलचा नेहमीचा त्रास सहन करणाऱ्या हार्बर लाईनवरच्या प्रवास्यांना बुधवारी पुन्हा मोठा मनस्तापाला सामोरे जावे

Harbor lines again disintegrate | हार्बर लाइन पुन्हा विस्कळीत

हार्बर लाइन पुन्हा विस्कळीत

Next

मुंबई : उशिरा धावणाऱ्या लोकलचा नेहमीचा त्रास सहन करणाऱ्या हार्बर लाईनवरच्या प्रवास्यांना बुधवारी पुन्हा मोठा मनस्तापाला सामोरे जावे लागले. वडाळाजवळील रावळी जक्शनजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेला फटका बसला. त्यामुळे २0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर लोकल अर्धा तास उशिराने धाव होत्या.
रावळी जक्शनजवळ सकाळी साडे अकराच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडामुळे हार्बरवरील अप आणि डाऊन लोकल सेवाच ठप्प झाली. ठप्प झालेली हार्बर रेल्वे सेवा सुरु राहावी यासाठी सीएसटी ते कुर्ला मेन लाईनवरुन हार्बर सेवा सुरु ठेवण्यात आली. लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी झाली. सिग्नल बिघाडाची माहीती मिळताच त्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतले. हे काम १२.२0 च्या सुमारास पूर्ण करण्यात आले आणि हार्बर अप आणि डाऊन सेवा पुर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे २0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. दरम्यान, मानखुर्द येथे स्थानिकांनी सकाळच्या सुमारास रेल रोको केल्यानेही हार्बर रेल्वेला काही प्रमाणात फटका बसला. पाणी प्रश्नासारख्या मुलभूत सोयि सुविधाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात सतंप्त झालेल्या मानखुर्द रहिवाशी रेल्वे रुळावर उतरले. स्थानिकांंच्या रेल रोको आंदोलनामुळे पंधरा ते वीस मिनिटे हार्बर सेवा खोळंबली होती.

Web Title: Harbor lines again disintegrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.