हार्बरवासी प्रवाशांना खूशखबर

By Admin | Published: May 30, 2016 02:02 AM2016-05-30T02:02:56+5:302016-05-30T02:02:56+5:30

हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी नऊ डब्याच्या लोकल १२ डबा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Harbor people happy | हार्बरवासी प्रवाशांना खूशखबर

हार्बरवासी प्रवाशांना खूशखबर

googlenewsNext


मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालविण्यासाठी नऊ डब्याच्या लोकल १२ डबा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या तीन दिवसांत हार्बरवरील २00 लोकल फेऱ्या १२ डब्यांच्या केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी मुंबईतील रेल्वेच्या एका कार्यक्रमात दिली. यामुळे हार्बरवासीयांचा प्रवास सुकर होण्यास मदत मिळेल.
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १२ डबा, त्याचबरोबर १५ डबा लोकलही धावत आहेत. मात्र हार्बरवासीय १२ डबा लोकलपासून उपेक्षितच होते. त्यामुळे १२ डबा लोकल चालविण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) मध्य रेल्वेच्या हार्बरवरील प्लॅटफॉर्मच्या लांबीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण करताना सीएसटी आणि डॉकयार्डमधील प्लॅटफॉर्मच्या लांबीकरणात मोठे अडथळे येत होते. मात्र ही कामेही नुकतीच पूर्ण करून हार्बरचा मार्ग मोकळा करण्यात आला आणि हार्बरवर १२ डब्यांची पहिली लोकल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावली. हार्बर मार्गावर सीएसटी ते कुर्ला अशी चार डब्यांची लोकल १९२५ साली धावली होती आणि त्यानंतर हार्बर रेल्वेनेही कात टाकण्यास सुरुवात केली. आता हार्बरवर आणखी लोकल फेऱ्या १२ डबा करण्याचे काम वेगाने केले जात आहे. हार्बर मार्गावर ३६ लोकलच्या ५९0 फेऱ्या होतात. सध्या हार्बर मार्गावर १२ डब्याच्या आठ लोकल धावत असून, येत्या काही दिवसांत २00 फेऱ्या आठ डब्यांच्या केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत १२ डब्यांच्या आणखी २00 फेऱ्या १२ डब्या केल्या जातील आणि जूनअखेरपर्यंत उर्वरित फेऱ्या १२ डबा होतील, असे सूद म्हणाले.

Web Title: Harbor people happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.