रुळाखालील खडी वाहून गेल्यानं हार्बर रेल्वे ठप्प

By admin | Published: June 28, 2017 09:14 AM2017-06-28T09:14:16+5:302017-06-28T09:53:28+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.

Harbor Rail jam is carrying the underground tunnels | रुळाखालील खडी वाहून गेल्यानं हार्बर रेल्वे ठप्प

रुळाखालील खडी वाहून गेल्यानं हार्बर रेल्वे ठप्प

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. मानखुर्दजवळ रेल्वे रुळाखालील खडी पावसामुळे वाहून गेल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मानखुर्द-सीएसटी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं या खोळंब्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

तर दुसरीकडे,  मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे.  येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलची वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे. यामुळे ऐन गर्दी व कार्यालय गाठण्याच्या वेळेस चाकरमान्यांचे हाल होत आहेत.  तर आज दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. 

 
‘मुसळधार’चा इशारा
 
 
 
 
 
 
बुधवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारी कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने वर्तविले आहे.
मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीला गती येण्यासाठी व पिकाची उगवण होण्यासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे.
 

Web Title: Harbor Rail jam is carrying the underground tunnels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.