बारा सेकंदात ‘हर्बरा’ नेस्तनाबूत; तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’

By admin | Published: January 9, 2017 10:01 PM2017-01-09T22:01:41+5:302017-01-09T22:01:41+5:30

चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत अचूकपणे एकाचवेळी चाळीस अग्निबाण (रॉकेट) डागण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉन्चरने बारा सेकंदात सहा अग्निबाण सोडून ‘हर्बरा’चे लक्ष्य अचूक भेदले.

'Harbra' breaks in 12 seconds; Towards 'All-round strike' | बारा सेकंदात ‘हर्बरा’ नेस्तनाबूत; तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’

बारा सेकंदात ‘हर्बरा’ नेस्तनाबूत; तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि.09 - चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत अचूकपणे एकाचवेळी चाळीस अग्निबाण (रॉकेट) डागण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉन्चरने बारा सेकंदात सहा अग्निबाण सोडून ‘हर्बरा’चे लक्ष्य अचूक भेदले. दरम्यान, निश्चित केलेल्या अकरा लक्ष्यांवर एकापाठोपाठ विविध तोफांद्वारे बॉम्बगोळे डागून ‘सर्वत्र प्रहार’ करण्यात आला. यावेळी ‘हर्बरा’सह सर्वच ठिकाणे नेस्तनाबूत झाली.
निमित्त होते, नाशिक येथील देवळालीमधील तोफखाना केंद्राच्या वतीने शिंगवे बहुला गोळीबार मैदानावर आयोजित ‘सर्वत्र प्रहार’ या युद्धजन्य प्रात्यक्षिक सोहळ्याचे.
दरम्यान, शत्रूच्या ठिकाणांची हेलिकॉप्टरद्वारे टेहळणी पूर्ण होताच तत्काळ लष्करी वाहनांच्या साहाय्याने युद्धभूमीवर विविध तोफा आणल्या जातात. यावेळी भारतीय बनावटीची १९६१ साली तोफखान्यात समाविष्ट झालेली सर्वांत जुनी १२० एमएम तोफ, कारगिल युद्धात वापरण्यात आलेली भारतीय बनावटीची १०५ एमएम इंडियन फिल्ड तोफ, रशियात तयार केलेली व सियाचीनच्या युद्धात वापरलेली १३० एमएम तोफ , १५५ एमएम सोल्टम तोफे सह अत्याधुनिक हायड्रोलिक यंत्रणेने सक्षम असलेली ३६० अंशात वेगाने फिरणारी व कमी-अधिक उंचीवर मारा करण्याची क्षमता ठेवणा-या कारगिल युद्धात वापरली गेलेल्या बोफोर्स तोफांद्वारे शत्रूच्या जव्हार बुद्रुक कॉम्प्लेक्समधील हर्बरा, कोन हिल, बहुला- १, बहुला- २, डायमंड, हम्प, हर्बरा, व्हाइट क्रॉस, रिक्टॅँगल,  या ठिकाणांवरअचूकपणे एकापाठोपाठ हल्ला चढविला जातो. यावेळी डागण्यात आलेल्या बॉम्बगोळ्यांच्या आवाजाने उपस्थितांच्या अंगाला शहारे आणले.
लेफ्टनंट जनरल सुब्रता साह, लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत तोफखाना केंद्राचा अभिमानास्पद असा प्रात्यक्षिक सोहळा यशस्वीपणे पार पडला. यावेळी तोफखाना केंद्राचे कमान्डंट मेजर जनरल जे. एस. बेदी हेदेखील उपस्थित होते. विविध संरक्षण विभागांतील अधिकारी, कर्मचारी, नेपाळ, भुतान, श्रीलंका या देशांचे पाहुणे लष्करी अधिकारी व तोफखाना केंद्रातील लष्करी अधिकारी, कर्मचारी व त्यांच्यी कुटुंबीयांसह प्रसारमाध्यमे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
 
‘आर्टिलरी’च्या सामर्थ्याचे दर्शन
भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा म्हणून तोफखाना केंद्राकडे बघितले जाते. युद्धामध्ये भूदलावरील सैन्याला महत्त्वाची ताकद देत निर्णायक भूमिका तोफखान्याचे जवान तोफांच्या मदतीने पार पाडतात. युद्धभूमीवर शत्रूच्या छावण्या उद्ध्वस्त करत ‘फत्ते’ मिळविण्यासाठी तोफांचा वापर महत्त्वाचा ठरतो. अत्याधुनिक भारतीय तोफखाना केंद्राच्या सामर्थ्याचे दर्शन ‘सर्वत्र प्रहार’मधून दरवर्षी घडते.

Web Title: 'Harbra' breaks in 12 seconds; Towards 'All-round strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.