जेटच्या विमानाचे हवेतच हेलकावे; दोनदा वाचले भुजबळ, खासदार प्रीतम मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:02 PM2018-09-29T17:02:18+5:302018-09-29T17:34:21+5:30

औरंगाबादेत विमानाची हार्ड लँडिंग, एका डॉक्टराची तक्रार

hard landing of jet airways in aurangabad; Bhujbal, MP Pritam Munde also traveling | जेटच्या विमानाचे हवेतच हेलकावे; दोनदा वाचले भुजबळ, खासदार प्रीतम मुंडे

जेटच्या विमानाचे हवेतच हेलकावे; दोनदा वाचले भुजबळ, खासदार प्रीतम मुंडे

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादकडे निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानाने उड्डानानंतर वीस मिनिटांनी हवेतच हेलकावे खायला सुरुवात केली आणि आतील प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले. काही क्षणात विमान वेगाने खाली येऊ लागले. हा थरार 10 मिनिटे सुरु होता. यानंतर पुन्हा विमानाने ठराविक उंची गाठली आणि विमान औरंगाबाद विमानतळावर मोठ्या प्रयत्नांनी उतरविण्यात आले. 


विमानाचा  हवेत थरार अनुभवल्यानंतर जीव भांड्यात पडतो न पडतो तोच औरंगाबादमध्ये उतरताना हाच अनुभव प्रवाशांना आला. विमान धावपट्टीवर उतरवताना जोरदार धक्के जाणवले. यामध्ये या डॉक्टरचे डोके विमानात आदळले. काहींना उलट्यांचा त्रास झाला. 
ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हे विमान मुंबईहून संध्याकाळी 4.46 वाजता निघाले होते.

या विमानामध्ये राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही होते. तसेच खासदार प्रीतम मुंडे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, काँग्रेसचे डॉ. जितेंद्र देहाडे आदी प्रवास करत होते. या थरारक प्रवासावेळी एका डॉक्टरचे डोके विमानात आदळल्याने त्यांनी याची तक्रार विमान कंपनीकडे केली आणि घटना उघड झाली. या डॉक्टरला एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांचे अहवाल नॉर्मल आल्यानंतर प्रकरण सामंज्यस्याने मिटविण्यात आले. 


या बाबत विमानतळ आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. 
 

Web Title: hard landing of jet airways in aurangabad; Bhujbal, MP Pritam Munde also traveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.