मराठवाड्यात होणार ‘हरितग्राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 02:28 AM2016-05-14T02:28:42+5:302016-05-14T02:28:42+5:30

पोलिसांच्या सहभागातून मराठवाड्याच्या नांदेड परिक्षेत्रात ‘हरितग्राम कम्युनिटी पोलिसिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडस (ता. कळमनुरी) येथे शुक्रवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

'Hari Gram' to be held in Marathwada | मराठवाड्यात होणार ‘हरितग्राम’

मराठवाड्यात होणार ‘हरितग्राम’

Next

हिंगोली : पोलिसांच्या सहभागातून मराठवाड्याच्या नांदेड परिक्षेत्रात ‘हरितग्राम कम्युनिटी पोलिसिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडस (ता. कळमनुरी) येथे शुक्रवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यात पोलिसांची भूमिका समन्वयकाची असेल.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस नेहमीची कामे तर करतातच, परंतु समाजाच्या विकासामध्ये पोलिसांचाही सहभाग असावा, या विचारातून नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी ‘कम्युनिटी पोलिसिंग’अंतर्गत सांडस गावाचे रुपांतर ‘हरितग्राम’मध्ये करण्याचा निर्धार केला आहे.
नांदेड परिक्षेत्रातील लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारचे अभियान पोलीस प्रशासन राबविणार आहे.

Web Title: 'Hari Gram' to be held in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.