हरीश मानधना यांचे निधन
By admin | Published: April 24, 2016 02:36 AM2016-04-24T02:36:42+5:302016-04-24T02:36:42+5:30
जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. हरीश रामेश्वर मानधना यांचे शनिवारी सायंकाळी
यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. हरीश रामेश्वर मानधना यांचे शनिवारी सायंकाळी येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे सतीश व नीलेश ही दोन मुले, कल्पना व कविता या दोन मुली आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा देह यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात येणार आहे.
खा. विजय दर्डा यांच्याकडून सांत्वन
मानधना यांचे निधन झाल्याची वार्ता कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी तातडीने मानधना कुटुंबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सांत्वन केले.
विजय दर्डा यांनी हरीश मानधना यांची मुले सतीश आणि नीलेश यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी हरीश मानधना यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, दर्डा परिवार आणि मानधना परिवाराचे जुने स्रेहसंबंध आहेत. लोकमत आणि दर्डा परिवार या दु:खामध्ये आपल्यासोबत आहे.