सीए अंतिम परीक्षेत पुण्याची हर्षा भट्टड तिसरी
By Admin | Published: August 9, 2014 02:56 AM2014-08-09T02:56:18+5:302014-08-09T02:56:18+5:30
देशातून पहिल्या तीन अनुक्रमाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. हर्षा ही परीक्षा दिलेल्या मुलींमध्येही पहिली आली आहे.
>मुंबई : दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) अंतिम परीक्षेत संजय नवंधार (जयपूर), कुणाल जेठानी (जोधपूर) आणि हर्षा भट्टड (पुणो) यांनी देशातून पहिल्या तीन अनुक्रमाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. हर्षा ही परीक्षा दिलेल्या मुलींमध्येही पहिली आली आहे.
देशात पहिल्या आलेल्या संजय नवंधारने 8क्क्पैकी 583 (72.88 टक्के) गुण मिळवले. त्याच्या खालोखाल 8क्क्पैकी 58क् (72.5क् टक्के) गुण मिळविणारा जोधपूरच्या कुणाल जेठानी दुसरा आला; तर देशात तिसरी व मुलींमध्ये पहिली आलेली पुण्याची हर्षा भट्टड हिला 71.75 टक्के म्हणजे 8क्क्पैकी 574 गुण मिळविले.
ही अंतिम परीक्षा ग्रुप-1 आणि ग्रुप-2साठी घेण्यात आली होती. ‘सीए’ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही ग्रुपमधील सर्व विषयांत उत्तीर्ण होणो अपेक्षित असते. या दोन्ही ग्रुपचा मिळून निकाल 7.29 टक्के लागला.
यापैकी ग्रुप-1मध्ये 13.5क् टक्के तर, ग्रुप-2मध्ये 1क्.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेला देशभरातून 42 हजार 533 विद्यार्थी
बसले होते. यापैकी 3 हजार 1क्क् विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रुप-1साठी 65 हजार 792 विद्यार्थी बसले होते. त्यातील 8 हजार 884 विद्यार्थी पास झाले. तसेच ग्रुप-2मध्ये एकूण 65 हजार 7क्6 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 7 हजार 4 विद्याथ्र्यानी यश मिळवले आहे.
रोज केला 12 तास अभ्यास
हे यश अनपेक्षित आहे. तिस:या क्रमांकावर येईन, असे वाटले नव्हते. यशाचे श्रेय मी आई-वडिलांसह सर्व मार्गदर्शक शिक्षकांना देते. जानेवारी ते मे असे पाच महिने दररोज किमान 12 तास अभ्यास केला. माझी मोठी बहीणही ‘सीए’ असल्याने तिचेही खूप मार्गदर्शन मिळाले. आता पुढे ‘सीए’ची प्रॅक्टिस करायची की एमबीए हे अजून ठरविले नाही. अध्यापनाचीही आवड आहे, असे हर्षा म्हणाली.
च्‘सीए’ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही ग्रुपमधील सर्व विषयांत उत्तीर्ण होणो अपेक्षित असते. या दोन्ही ग्रुपचा मिळून निकाल 7.29 टक्के लागला.