कर सहायक परीक्षेत हर्षल भामरे प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:10 AM2019-05-07T06:10:14+5:302019-05-07T06:11:05+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यात प्रथम आले.
Next
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील
हर्षल भामरे हे राज्यात प्रथम आले. महिलांमधून बीड जिल्ह्यातील कल्पना मुंडे या प्रथम आल्या आहेत.
एमपीएससीतर्फे कर सहायक पदाच्या ४७८ पदांसाठी १४ आॅक्टोबर २०१८ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने म्हटले आहे.