हर्षवर्धन पाटील यांची होणार चौकशी

By admin | Published: December 31, 2014 02:23 AM2014-12-31T02:23:51+5:302014-12-31T02:23:51+5:30

कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इतरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी परवानगी दिली़

Harshwardhan Patil's inquiry will be conducted | हर्षवर्धन पाटील यांची होणार चौकशी

हर्षवर्धन पाटील यांची होणार चौकशी

Next

धुळे बँक भ्रष्टाचार प्रकरण : राज्याच्या गृहविभागाने दिली मान्यता
यदु जोशी- मुंबई
धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इतरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे खुली चौकशी करण्यास राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी परवानगी दिली़
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी खुल्या चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून, ती पुढील मान्यतेसाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे पाठवण्यात आली आहे़
धुळे जिल्हा बँकेने १४४ कोटी रुपयांचे नियमबाह्ण कर्ज वाटप केले़ या कर्जाची वसुलीदेखील होत नाही़ ज्या संस्थांना कर्ज दिले़ त्यातील बऱ्याच डबघाईला आलेल्या होत्या, या आशयाची तक्रार धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक
प्रविण दीक्षित यांच्याकडे केली होती़ आमदार गोटे हे तेलगी प्रकरणात वादग्रस्त ठरले होते़ हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपण बँकेतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी केल्या आहेत़
पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही़ उलट पाटील यांनी घोटाळ्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली, असे गोटे यांचे म्हणणे होते़
माजी मंत्री अमरीश पटेल यांच्याशी संबंधित प्रियदर्शनी कॉटन को़ आॅप़ सोसायटीला ती तोट्यात असताना १६६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल़े़ तसेच अमोदा आॅईल सीडस् सोसायटीला साडेचार कोटी कर्ज देण्यात आले़

घोटाळ्यासंदर्भात माजी आमदाराने केली होती तक्रार
भ्रष्टाचाराचे आरोप असतानादेखील धीरज चौधरी यांना बँकेच्या व्यवस्थापकपदी नेमण्यात आले, असे आरोप गोटे यांनी केले होते़ बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी माजी आ़ राजवर्धन कदमबांडे तसेच बँकेच्या सात संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होत़े या आरोपांची तपासणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुल्या चौकशीची परवानगी गृहविभागाकडे मागितली होती़ त्याला मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी मंजुरी दिली़

Web Title: Harshwardhan Patil's inquiry will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.