बाटलीबंद पाण्याला वसईत सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2016 03:35 AM2016-05-18T03:35:46+5:302016-05-18T03:35:46+5:30

वसई तालुक्यात बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी अक्षरश: नामांकित कंपन्याच्या लेबल खाली नळाचे पाणी विकण्याचा प्रकार सुरु केला

The harvest day of spring water to bottled water | बाटलीबंद पाण्याला वसईत सुगीचे दिवस

बाटलीबंद पाण्याला वसईत सुगीचे दिवस

Next

विरार : सध्या उन्हाळा सुरु असून तापमानाने ३७ अंशाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे वसई तालुक्यात बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी अक्षरश: नामांकित कंपन्याच्या लेबल खाली नळाचे पाणी विकण्याचा प्रकार सुरु केला आहे.
५०० एम. एल., १ लीटर, २० लिटरच्या जार मधून मोठ्याप्रमाणात हा व्यावसाय केला जात आहे. उन्हाच्या काहिलीत गार पाणी मिळत असल्याने कुणी आक्षेप घेतांना दिसत नाही. याचाच फायदा व्यावसायिकांनी उठवला आहे. या पाण्याच्या शुध्दते बाबत मात्र प्रश्न चिन्ह उभे राहत आहे. पेल्हार, वसई फाटा, कामण, सातावली, शिरसाड हया परिसरात हा व्यवसाय मोठया प्रमाणात केला जातो.
प्रत्यक्ष पहाणी केली असता यापैकी काही कंपन्याकडे उच्चदर्जाचे जलशुध्दीकरण्याच्या मशिन्स नाहीत. तरीही त्या पाणी ५०० एम. एल. १० रू., १ लिटर २० रू., २० लिटर जार ५० रू. हया प्रमाणे दर आकारून पाणी विक्री करीत आहे. त्याचप्रमाणे जल शुद्धीकरण प्रकल्प उभारतांना लागणारे परवाने सुद्धा अनेकांकडे नाहीत.
(वार्ताहर)

Web Title: The harvest day of spring water to bottled water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.