"जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली", हरयाणाच्या निकालांनंतर अजित पवार गटाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:47 PM2024-10-08T19:47:21+5:302024-10-08T19:49:18+5:30

Haryana Assembly Election 2024: हरयाणामधील निकालांनंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी महायुतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. या निकालांमुळे जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. 

Haryana Assembly Election 2024: Situation on ground came before people today, reaction of Ajit Pawar group after Haryana results | "जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली", हरयाणाच्या निकालांनंतर अजित पवार गटाची प्रतिक्रिया

"जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली", हरयाणाच्या निकालांनंतर अजित पवार गटाची प्रतिक्रिया

मुंबई - हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवताना विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या विजयानंतर भाजपा आणि भाजपाच्या मित्रपक्षांचा कमालीचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, या निकालांनंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी महायुतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. या निकालांमुळे जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे.

इंडिया आघाडीने माध्यमांमधून हरयाणामध्ये काँग्रेस सत्तेत येणार,अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले. परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज लोकांसमोर आली आहे. हरयाणामध्ये जिलेबी खायची कुणावर वेळ आली आहे, हे सिद्ध झाले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेसला लगावला.

काश्मीर खोऱ्यातील विचार करता तिथे नॅशनल कॉन्फरन्स पार्टी अनेक वर्षे काम करत आहे. तिथे भाजप इतर पक्षांचे कमी अस्तित्व आहे आणि दुसऱ्या बाजूला जम्मूमध्ये भाजप एक नंबरवर आहे. कॉंग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या जीवावर मिळाल्या आहेत. स्वतःच्या जीवावर जागा मिळवता आलेल्या नाहीत. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे. अनेक घटक नाराज आहेत हा जो प्रचार इंडिया आघाडीने केला होता हे फक्त माध्यमांना हाताशी धरून लोकांची दिशाभूल करत होते हे सिद्ध झाले आहे असा जोरदार प्रतिहल्ला प्रफुल पटेल यांनी केला आहे.

मागील दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात प्रगती करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अशा अनेक क्रांतिकारी योजनांमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे कुणाला नाकारता येणार नाही, असेही प्रफुल पटेल म्हणाले. 

यावेळी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की,  महायुतीमध्ये समन्वय आहे. विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उरलेल्या ज्या जागा आहेत. त्यावर एक-दोन दिवसात बसून योग्य मार्ग काढणार आहोत. महायुतीमध्ये मतभेद आहेत असे विरोधकांकडून चित्र उभे करण्यात येत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. आऊटगोईंग आणि इनकमिंगचा जो विषय आहे. त्यामध्ये काही माणसे इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत काही लोकं इकडेतिकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्याचा अर्थ जनसामान्यांच्या मनात नाराजी आहे असा नाही. स्थानिक स्तरावर काही गणितं बिघडवण्यासाठी इकडेतिकडे जात असतात. पण आज हरयाणाचा निकाल आल्यानंतर आऊटगोईंग आणि इनकमिंग करणारे विचार करतील, अशी खात्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

Web Title: Haryana Assembly Election 2024: Situation on ground came before people today, reaction of Ajit Pawar group after Haryana results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.