८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:23 AM2024-07-04T08:23:16+5:302024-07-04T08:24:32+5:30

हाथरस चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी; घातपाताची शक्यता

hathras Stampede: 80,000 people were allowed, 250,000 attended the satsang; Death occurred in stampede | ८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

राजेंद्र कुमार

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १२१वर पोहोचली असून. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही दुर्घटना घडविण्याचा कट आखण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.

सत्संगासाठी ८० हजार लोकांनाच परवानगी असताना प्रत्यक्षात अडीच लाख लोक तिथे आले होेते, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केली आहे.  हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भोलेबाबांचा सत्संग होता. सत्संग झाल्यानंतर भोलेबाबा निघाले, तेव्हा त्यांच्या पायाखालची माती घेण्यास भाविक पुढे सरसावले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी हाथरस येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप
हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील बहुतांश मृत व्यक्तींची ओळख पटली असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले की, सत्संगाला नेमके किती लोक आले, याचा खरा आकडा आयोजकांनी सांगितला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी पुरावे दडविण्याचे काम केले. 

एफआयआरमध्ये भोलेबाबांचा उल्लेख नाही
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला पोलिस किंवा स्थानिक प्रशासन जबाबदार नाही. मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर व आयोजकांपैकी आणखी काही जणांची नावे एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. मात्र त्यात भोलेबाबांचा उल्लेख केलेला नाही. 

Web Title: hathras Stampede: 80,000 people were allowed, 250,000 attended the satsang; Death occurred in stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.