कधी पाहिलंत का ? नाग, पाल, विंचू एकत्र !
By admin | Published: August 7, 2016 05:43 PM2016-08-07T17:43:07+5:302016-08-07T17:43:40+5:30
सोलापूरपासून 32 किमी अंतरावर असलेल्या सावरगाव ( ता. तुळजापूर) येथे नागोबा देवस्थान यात्रेनिमित्त नाग, पाल, विंचू हे एकमेकांचे हाडवैरी एकत्रित दर्शन देतात
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 7- सोलापूरपासून 32 किमी अंतरावर असलेल्या सावरगाव ( ता. तुळजापूर) येथे नागोबा देवस्थान यात्रेनिमित्त नाग, पाल, विंचू हे एकमेकांचे हाडवैरी एकत्रित दर्शन देतात, अमावस्येपासून या यात्रेला सुरुवात होते.
राज्याच्या कानाकोप-यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. आज पहाटेपासून भाविकानी दंडवत घालून सुवासिनींनी लाह्या आणि दूध, पूरण पोळीचा नैवेद्य दाखवून नागपंचमी साजरी केली. आजच्या काळात या यात्रेकडे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून पाहिले जात असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
नाग, पाल, विंचू हे मुके प्राणी एकत्र येतात तर समाजातील प्रत्येकानी एकत्र येण्याचा संदेश देणारी ही यात्रा असल्याची भावना राजेश कदम, शर्वरी देशपांडे, अजय जाधव आदी भाविकानी व्यक्त केल्या.
गेल्या पाच दिवसापासून नाग, पाल, विंचू याचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक च्या विजापूर, गुलबर्गा येथील भाविकांची गर्दी लोटली आहे, हजारो वर्षापासून या यात्रेला परंपरा असल्याचे पुजारी कल्याण स्वामी यानी सांगितले, यात्रेची सांगता सायंकाळी गण (मिरवणूक ) काढून भाकणुकीने होणार आहे,