एचडीएफसी बँकेचे ५१ लाख लुटले

By admin | Published: December 23, 2015 01:54 AM2015-12-23T01:54:46+5:302015-12-23T01:54:46+5:30

एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कॅशव्हॅनमधून ५१ लाखांची रोकड घेऊन सिक्युरिटी कंपनीचा कस्टोडीयन पसार झाला.

HDFC Bank loses 51 million | एचडीएफसी बँकेचे ५१ लाख लुटले

एचडीएफसी बँकेचे ५१ लाख लुटले

Next

वसई : एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कॅशव्हॅनमधून ५१ लाखांची रोकड घेऊन सिक्युरिटी कंपनीचा कस्टोडीयन पसार झाला. ही घटना सोमवारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचोटी ब्रीजजवळ घडली. स्वप्निल जोगळे असे आरोपीचे नाव असून, वालीव पोलिसांनी त्याची पत्नी आणि भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुुरू केली आहे.
एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम भरण्याचे काम सायंटीफीक सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडून केले जाते. सोमवारी संध्याकाळी कंपनीची कॅशव्हॅन (क्र. एमएच ४३/ एपी/ ६०६५) भांडुप येथून वसई-विरार भागातील बँकेच्या एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी आली होती. व्हॅनमध्ये चालक, एक कस्टोडियन व गार्ड यांचा समावेश होता. दुसरा कस्टोडीयन स्वप्निल जोगळे हा त्यांना वसई पूर्व कामण येथील एटीएम केंद्रावर भेटला. त्यानंतर एचडीएफसी बँकेच्या कामण व नायगाव एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम भरण्यात आली.
जोगळे याने कॅश लुटण्याचा आधीच प्लॅन केला होता. त्यानुसार नायगाव येथील मशिनमध्ये कॅश भरल्यानंतर बँकेचे आॅडिटर आले असल्याने कामण येथे जावे लागेल असा असा बहाणा करून जोगळेने कॅशव्हॅन पुन्हा कामणच्या दिशेने वळवली. गाडी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चिंचोटी ब्रीजजवळ आल्यानंतर स्वप्निलने गाडी बाजूला थांबवण्यास सांगितले. पुढच्या एटीएमजवळ कॅश काढता येणार नाही असा बहाणा करून स्वप्निलने व्हॅनच्या तिजोरीतील ५१ लाख रुपये स्वत:जवळील बॅगेत भरले; आणि कुणाला काही कळायच्या आत तिथून पळ काढला.
मंगळवारी सकाळी कंपनीचे शाखा व्यवस्थापक बरुण मंडल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीची पत्नी व त्याचा भाऊ या दोघांकडून काही रक्कमही हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. स्वप्निल जोगळे मात्र अद्याप फरार आहे.

Web Title: HDFC Bank loses 51 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.