मनोकामना पुर्ण न झाल्याने त्याने केली हनुमान मूर्तीची तोडफोड

By admin | Published: August 18, 2016 04:29 PM2016-08-18T16:29:29+5:302016-08-18T16:29:29+5:30

मनोकामना पुर्ण न झाल्याने एकाने हनुमान मूर्तीची तोडफोड केल्याची घटना काकडखुंट, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

He did not fulfill the wish of Hanuman idol | मनोकामना पुर्ण न झाल्याने त्याने केली हनुमान मूर्तीची तोडफोड

मनोकामना पुर्ण न झाल्याने त्याने केली हनुमान मूर्तीची तोडफोड

Next

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार : मनोकामना पुर्ण न झाल्याने एकाने हनुमान मूर्तीची तोडफोड केल्याची घटना काकडखुंट, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसात संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकडखुंट येथील यशवंत मगन वसावे (३८) यांनी गावातील हनुमान मंदीरात मनोकामना पुर्ण होण्यासाठी प्रार्थना केली होती. परंतू त्यांनी मागितलेली मनोकामना पुर्ण झाली नाही. त्यामुळे ते नैराश्येत राहत होते. त्याच नैराश्येतून वसावे यांनी दगडाने मूर्तीवरील मुकूट आणि कमरेखालील भाग फोडला. ही बाब गावात कळाल्यावर एकच खळबळ उडाली. जमाव मंदीराजवळ जमला. संबधितावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

पोलिसांनाही कळविण्यात आले. याबाबत गावाचे पोलीस पाटील अन्वरसिंग मगन वसावे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने यशवंत वसावे याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: He did not fulfill the wish of Hanuman idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.