बारबालांच्या भीतीपोटी त्यानं संपवलं आयुष्य

By Admin | Published: February 20, 2017 01:21 PM2017-02-20T13:21:59+5:302017-02-20T13:25:24+5:30

मुुंबईमधील आंबोली येथे सुरेश नगरमधील म्हाडा बिल्डिंगमध्ये राहणा-या 25 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. विजय गोगलिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

He ended his life with fear of Barbals | बारबालांच्या भीतीपोटी त्यानं संपवलं आयुष्य

बारबालांच्या भीतीपोटी त्यानं संपवलं आयुष्य

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - आंबोलीतील सुरेश नगरमधील म्हाडा बिल्डिंगमध्ये राहणा-या 25 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. विजय गोगलिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विजयने स्वतःचे आयुष्य संपवण्यापूर्वी आत्महत्येचे कारण आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले होते, मात्र पोलीस मोबाइल देण्यास नकार देत आहेत, असा आरोप विजयच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
 
विजयच्या आईने सांगितले की दोन दिवसांपूर्वी त्याच्या बिल्डिंगसमोर राहणा-या दोन बारबाला आणि त्यांच्या माणसांनी विजयवर छेडछाडीचा आरोप लावत त्याला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्यांनी घटनेची व्हिडीओ क्लिप बनवली व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी विजयला दिली होती. 
(भिवंडीत चौघांचा होरपळून मृत्यू, नातेवाईकांचा पोलिसांसमोर ठिय्या)
 
विवाहित आणि एक मुलाचा बाप असल्याच्या कारणामुळे विजयला बदनामीची भीती सतावू लागली आणि त्यांच्या धमक्यांना कंटाळून अखेर विजयने गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारबाला गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास आहेत. आसपासच्या परिसरात अनेक बिअर बारदेखील आहेत. त्यामुळे या बारबालांच्या उलट-सुलट वागण्यामुळे तिथे राहणा-या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
(अंत्यसंस्कारावेळी जिवंत झाला मृतदेह)
 
मात्र भीतीपोटी कुणाचीही या बारबालांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची हिंमत होत नाही. दरम्यान, विजय यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चंदेलिया यांच्या नेतृत्वात आंबोली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात नारेबाजी केली होती. 
 
यानंतरही पोलिसांकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस संपूर्ण घटनाक्रम तसंच स्थानिकांच्या तक्रारींची चौकशी करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय गायकवाड यांनी दिली. 
 

Web Title: He ended his life with fear of Barbals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.