हद्दीचा वाद मिटवून जनहिताची कामे करणार

By admin | Published: August 6, 2016 03:07 AM2016-08-06T03:07:33+5:302016-08-06T03:07:33+5:30

हद्दीच्या वादात रखडल्याचा आरोप शुक्रवारी प्रभाग क्र. ६ मध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात नागरिकांनी केला

He has done the work of public works by resolving the issue of the issue | हद्दीचा वाद मिटवून जनहिताची कामे करणार

हद्दीचा वाद मिटवून जनहिताची कामे करणार

Next


ठाणे : रस्ते, पायवाटा, गटारे, शौचालयांची न झालेली दुरुस्ती, स्मशानभूमीची दुरवस्था आदी ढोकाळी, मनोरमानगर परिसरांतील समस्या प्रभागातील हद्दीच्या वादात रखडल्याचा आरोप शुक्रवारी प्रभाग क्र. ६ मध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात नागरिकांनी केला. त्यावर, हद्दीचा वाट मिटवून विरोधक जर एकदिलाने काम करण्यास तयार असतील, तर आणि तरच येथील कामे होऊ शकतील, असे परखड प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर यांनी केले. यापुढे हद्दीचा वाद चघळत न बसता जनतेच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर आणि देवराम भोईर उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या मांडल्या. विरोधाला विरोध न करता अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्याला या दोन्ही नगरसेवकांनी समर्पक उत्तरे दिली. मनोरमानगर भागात असलेल्या शौचालयांच्या समस्या, शहानगरची पाण्याची समस्या हद्दीच्या वादात अडकली असून काम सुरू असताना येथील पाइप चोरीला कसे जातात, असा सवाल एका महिलेने उपस्थित केला. ज्या ठिकाणी कचरापेटीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी त्या न ठेवता दुसऱ्या ठिकाणी का ठेवल्या जातात. कचरापेट्यांची संख्या वाढवण्याची मागणीदेखील रहिवाशांनी केली. परिवहनच्या बसची संख्या वाढवतानाच ही सेवा हायलॅण्डमार्गे न ठेवता पुन्हा कापूरबावडीमार्गे वळवण्याची मागणी रहिवाशांनी केली. या समस्या मांडतानाच काही नागरिकांनी नगरसेवकांनी केलेल्या कामांचे कौतुकही केले.
यासंदर्भात संजय भोईर यांनी सांगितले की, मनोरमानगरसाठी बसेसची संख्या वाढवण्याकरिता प्रयत्न सुरू असून नव्याने परिवहनमध्ये दाखल होणाऱ्या १९० बसपैकी या मार्गावर बसेस वाढवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनोरमानगर ही हायलॅण्डमार्गे वळवण्यात आल्याने परिवहनचे उत्पन्न वाढल्याकडे त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मनोरमानगर भागातील रखडलेला रस्ता आणि शहानगरच्या पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी हद्दीचा वाद विसरण्यास तयार आहे. परंतु, समोरचे जर काम सुरू असताना आडकाठी करीत असतील तर मी काम कसे करायचे, असा प्रतिसवालही भोईर यांनी नागरिकांना केला. परंतु, तुमची तयारी असेल तर मी हद्दीचा वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे.

Web Title: He has done the work of public works by resolving the issue of the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.