मुलीशी लग्न करण्यापूर्वी त्यानं केले होतं चक्क मुलाशी लग्न, मोबाईलमुळे प्रकरण आले उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 10:53 PM2017-08-21T22:53:58+5:302017-08-21T22:54:49+5:30
मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये...
कल्याण, दि. 21 - मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने मुलीशी लग्न करण्यापूर्वी एका मुलाशी विवाह केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या उच्चशिक्षित मिलिंद साळवे याने 2015 मध्ये घरच्यांच्या मर्जीने मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या 24 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीशी लग्न केलं होतं. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर एका चिमुकल्या मुलीच्या रुपाने फुलही उमललं. मात्र यानंतर समोर आलेल्या एका प्रकाराने त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. कारण पतीचं आधीच एका मुलासोबत आधीच लग्न झालेलं असल्याचं तिला समजलं.
लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्यामधील संवाद कमी झाला. आपला नवरा सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. मिलिंद साळवे आपल्या पत्नीला फोनही हातात घेऊ देत नसे. त्यामुळे त्या तरुणीला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबध असल्याची शंका आली. पतीच्या नकळत तिने त्याचा मोबईल चेक केला असता तिला त्यामध्ये एक नंबर मिळाला ज्यावर आपला मिलिंद साळवे सतत बोलत होता. विशेष म्हणजे तो नंबर एका मुलीच्या नावने सेव्ह केला होता. पतीच्या नकळत तिने त्या नंबरवर तिने फोन केला असता तिला धक्काच बसला. कारण समोर पुरुष बोलत होता. ती अस्वस्थ झाली. तिला हे सर्व समजल्यानंतर तिला घरच्यांनी त्रासही देणं सुरू केलं. या लग्नाचे फोटोही या तरुणीला सापडले आणि ती आणखी हादरली.
तरुणीला हा सगळा त्रास असह्य झाल्यावर माहेरी धाव घेतली. तिथून महिला तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदवण्यात आली. मात्र नवरा माघार घेण्यास किंवा तडजोड करण्यास तयार नसल्यानं सरतेशेवटी खडकपाडा पोलीस ठाण्यात या तरुणीनं फसवणुकीची तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 420, 498 नुसार गुन्हा नोंदवला असून अद्याप हा तरुण किंवा त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आलेली नाही. हा सगळा प्रकार तरुणाच्या आई-वडिलांना आधीच माहित असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.