मृत म्हणून घोषित झालेला 'तो' पोस्टमार्टम रुममधून जीवंत परतला

By admin | Published: October 12, 2015 10:44 AM2015-10-12T10:44:11+5:302015-10-12T10:44:41+5:30

रविवारी दुपारची वेळ...बेशुद्धावस्थेत असलेल्या ४५ वर्षाच्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.... डॉक्टरांनी रुग्णाला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले

He returned alive from the post-mortem room declared as dead | मृत म्हणून घोषित झालेला 'तो' पोस्टमार्टम रुममधून जीवंत परतला

मृत म्हणून घोषित झालेला 'तो' पोस्टमार्टम रुममधून जीवंत परतला

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - रविवारी दुपारची वेळ...बेशुद्धावस्थेत असलेल्या ४५ वर्षाच्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.... डॉक्टरांनी रुग्णाला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले... यानंतर 'मृतदेहा'ला शवविच्छेदनासाठी पोस्टमार्टम रुममध्ये नेण्यात आले... मात्र रुमच्या आत नेत असताना तो व्यक्ती जीवंत असल्याचे लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना घडली  शीवमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात. 

रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास सुलोचना शेट्टी मार्गावरील एसटी डेपोजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केली व त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच त्याला तातडीने पोस्टमार्टम रुममध्ये नेऊन त्याचे शवविच्छेदन करुन घ्या असेही कर्मचारी आणि पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिस व पोस्टमार्टम रुममधील कर्मचारी तो मृतदेह घेऊन शवविच्छेदन गृहाकडे निघाले. खोलीजवळ पोहोचले असताना कर्मचा-यांना मृतदेह श्वास घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने डॉक्टरांना बोलवून घेतले व तपासणीत तो व्यक्ती जीवंत असल्याचे स्पष्ट झाले. 

सध्या त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही. बेशुद्ध व्यक्तीला मृत घोषित करणा-या डॉक्टरने या संदर्भातील सर्व कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणावर पोलिसांनीही नाराजी व्यक्त केली. 

 

Web Title: He returned alive from the post-mortem room declared as dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.