तो रिक्षाचालक आला दूत म्हणुन संजय पवारच्या सतर्कतेमुळे वाचले ३०० जणांचे जीव

By अनिकेत घमंडी | Published: October 28, 2017 06:11 PM2017-10-28T18:11:50+5:302017-10-28T18:16:50+5:30

नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च्या सुमारास घरातील एका भिंतिचा खालचा भाग तुटत असल्याचे जाणवले. तसेच दरवाजाजवळचा भाग खचत असल्याचे दिसले.

 He said that as a result of the alertness of Sanjay Pawar, the rickshaw puller has saved 300 people alive | तो रिक्षाचालक आला दूत म्हणुन संजय पवारच्या सतर्कतेमुळे वाचले ३०० जणांचे जीव

रिक्षाचालक दूत बनुन आला

Next
ठळक मुद्देनागुबाई निवास या चार मजली इमारतीरिक्षाचालक दूत

डोंबिवली: नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च्या सुमारास घरातील एका भिंतिचा खालचा भाग तुटत असल्याचे जाणवले. तसेच दरवाजाजवळचा भाग खचत असल्याचे दिसले.
त्याची संजयने तात्काळ दखल घेत हा प्रकार काहीतरी वेगळा असल्याची सतर्कता दाखवली. त्याने तातडीने त्याच्या भावाशी चर्चा केली. भावानेही ही घटना गंभीर असल्याचे सांगितले. तेवढ्यात संजयला पिलर खचला असल्याचे दिसले, त्यानंतर मात्र त्याने क्षणाचाही विलंब न लावता आरडाओरडा केला. तडक चौथ्या मजल्यावर धाव घेतली. दिसेल त्याचा दरवाजा वाजवला. दिसेल त्याला बोलावले, आवाज दिला. पळापळा बाहेर पडा असे सांगितले. संजयचा आवाज आल्याने अन्य रहिवाश्यांनीही नेमके काय झाले हे बघण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. इमारतीला तडे पडत असून माती पडत असल्याचे ऐकल्यावर मात्र रहिवाश्यांनी जीव मुठीत धरुन जीन्यावरुन पळ काढला. जसे जमेल तसे सगळे घराबाहेर आले. तरीही संजयने पुन्हा सगळया घरांमध्ये जात कोणी राहीले नाही ना याची चाचपणी केली. सगळे बाहेर येताच तिस-या आणि चौथ्या मजल्यावरील गॅलरीचा भिंतीला तडे गेले. काही काळातच इमारत कोसळणार या भितीने रहिवासी तणावाखाली होते. मात्र कोणीही इमारतीत नसल्याने केवळ संजयच्या सतर्कतेमुळे शेकडो रहिवाश्यांमुळे जीव वाचला. त्यामुळे त्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. पश्चिमेच्या रिक्षा चालक-मालक युनियनचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी संजयचे विशेष कौतुक केले. महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही ती माहिती मिळाल्यावर त्यांनी संजयच्या सतर्कपणाबद्दल समाधान व्यक्त केले.
संजयने या इमारतीमधील रहिवाश्यांना घराला घर मिळावे, कोणावरही अन्याय होता कामा नये. घर मालकानेही सहकार्य करावे, महापालिकेने घर कधी, किती अवधीत मिळणार याची शाश्वती रहिवाश्यांना द्यावी,अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
========

Web Title:  He said that as a result of the alertness of Sanjay Pawar, the rickshaw puller has saved 300 people alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.