... अन सर्वांसमोर ‘त्यांनी’ काढल्या ‘उठबश्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 03:40 PM2016-08-12T15:40:13+5:302016-08-12T15:42:51+5:30
शहरात उघडयावर शौचास जाणा-यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास जावू नका असे सांगूनही काही जण ते पाळत नसल्याने वाशिम नगरपरिषद स्वच्छता विभागाच्यावतीने नविन ‘फंडा’ तयार करण्यात आला.
Next
>ऑलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - नगरपरिषद वाशिमच्यावतीने शहरात उघडयावर शौचास जाणा-यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास जावू नका असे सांगूनही काही जण ते पाळत नसल्याने नगरपरिषद स्वच्छता विभागाच्यावतिने नविन ‘फंडा’ तयार करण्यात आला. यामुळे उघडयावर शौचास जाणाºयांची चांगलीच पंचाईत झाली आहे. उघडयावर शौचास जातांना दिसल्याबरोबर पथक त्याला पकडून आणून सर्वांसमोर उठबश्या काढण्याची शिक्षा देत आहेत. यामुळे अनेकजण खजिल होवून शौचालयाचा वापर तर ज्यांच्याकडे शौचालय नाही असे तो बांधण्याचा विचार करीत आहेत.
उघडयावर शौचास बसल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. उघडयावर शौचास जावू नये म्हणून शासनाच्यावतिने शौचालय बांधकामासाठी अनुदानही दिल्या जाते. अनेकांनी अनुदान घेवून शौचालयाचे बांधकाम केले पण त्याचा वापर केल्या जात नसल्यान नगरपरिषदेच्यावतिने धडक मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी नगरपरिषदेचे स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, लाला मांजरे, दशरथ मोहळे, मुकादम व सफाई कर्मचारी शहरातील वेगवेगळया भागात जावून उघडयावर शौचास जाणाºयांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. उघडयावर शौचालयास जाणाºया नागरिकांनाही नगरपरिषदेच्या या मोहीमेची कल्पना झाल्याने अनेकजण पहाटे उठूनचं आपला कार्यक्रम उरकवून घेत असल्याची चर्चा आहे. सर्वांसमोर उठबशा काढाव्या लागत असल्याने अनेकांनी याची धास्ती घेतली आहे.