दुभाजकावर डोके आपटून तरुणी ठार

By admin | Published: April 19, 2016 01:28 AM2016-04-19T01:28:30+5:302016-04-19T01:28:30+5:30

भरधाव दुचाकी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीला धडकल्यामुळे चालक तरुणीचा दुभाजकावर आदळून रस्त्यावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

The head killed a couple on the divider | दुभाजकावर डोके आपटून तरुणी ठार

दुभाजकावर डोके आपटून तरुणी ठार

Next

पुणे : भरधाव दुचाकी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीला धडकल्यामुळे चालक तरुणीचा दुभाजकावर आदळून रस्त्यावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. अपघातानंतर या तरुणीचा मृतदेह तब्बल पाऊणतास अपघातस्थळीच पडून होता. वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिका पोचायला उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट घातलेले असतानाही त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.
सुप्रिया सोपान शिळीमकर (रा. सूर्यगंगा सोसायटीजवळ, पासुडी, धायरीगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया पती अणि दोन मुलांसह वडगाव धायरीमध्ये राहण्यास होत्या. जंगलीमहाराज रस्त्यावरच्या एका खासगी सीएकडे त्या अकाऊंटंट म्हणून नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या सोमवारी सकाळी हेल्मेट घालून दुचाकीवरून कामावर जात होत्या. सिंहगड रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथील सिग्नल सुटल्यानंतर त्या विठ्ठलवाडीच्या पुढे आल्या. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांनी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासमोरच एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
वेग जास्त असल्यामुळे त्यांचे शरीर तीन ते चार वेळा गोल फिरत लांबवर फेकले गेले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटचा आकार लहान असल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातस्थळाजवळच थांब्यावर जाण्यासाठी नेमकी त्याच वेळी एक पीएमपीची बस गेली. अपघात पाहून प्रवाशांनी आरडाओरडा करताच चालकाने बस थांबवली. पीएमपी बस थांबल्यामुळे बसखाली आल्यानेच हा अपघात झाल्याची अफवा पसरत गेली. सुप्रिया यांच्या पर्समध्ये मिळालेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
> दुचाकी चालकांनी हेल्मेट चांगल्या दर्जाचे, आयएसआय मार्क असलेले तसेच तपासूनच वापरावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने हेल्मेट वापराबाबत कायमच जनजागृती केली असून, जीव महत्त्वाचा असल्यामुळे अन्य कोणत्याही वादविवादापेक्षा हेल्मेट वापरणे अत्यावश्यक असल्याचे नुकतेच मालिकेद्वारे मांडले होते.

Web Title: The head killed a couple on the divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.