शाळेतून काढल्याचा रागात मुख्याध्यापिकेस मारहाण
By Admin | Published: October 20, 2016 08:07 PM2016-10-20T20:07:52+5:302016-10-20T20:07:52+5:30
शाळेतून काढल्याचा राग येवून जमावाने मुख्याध्यापिकेस कार्यालयात घुसून मारहाण करून धमकी दिली तसेच कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना कोराई
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २० : शाळेतून काढल्याचा राग येवून जमावाने मुख्याध्यापिकेस कार्यालयात घुसून मारहाण करून धमकी दिली तसेच कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना कोराई, ता.अक्कलकुवा येथे घडली. खापर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोराई येथे कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय आहे. या विद्यालयातील कर्मचारी संगिता मोतिराम वसावे यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा दगडू भावसार यांनी काढून टाकले होते. त्याचा राग संगिता वसावे यांना होता. त्याबाबत जाब विचारण्यासाठी वसावे यांच्यासह त्यांचे नातेवाईक विद्यालयात गेले. मनिषा भावसार यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. धमकी देवून खुर्च्यांची तोडफोड केली.
याबाबत मनिषा भावसार, रा.खापर यांच्या फिर्यादीवरून संगिता मोतिराम वसावे रा.कोराई व निलेश पाडवी, निलेश वळवी, सगुना वसावे, सरदार वळवी सर्व रा.खापर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.