मुख्याध्यापिकेची शाळेत आत्महत्या

By Admin | Published: May 7, 2014 08:51 PM2014-05-07T20:51:56+5:302014-05-07T21:03:34+5:30

संस्थेच्या एका पदाधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे पती दत्तात्रय जाधव यांनी केला आहे़

Headmistress's School Suicide | मुख्याध्यापिकेची शाळेत आत्महत्या

मुख्याध्यापिकेची शाळेत आत्महत्या

googlenewsNext

कोल्हापूरमधील घटना : संस्थेकडून त्रास, पतीचा आरोप


कोल्हापूर : मुख्याध्यापिकेने शाळेतच गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वसंतराव चौगुले विद्यालयात घडला़ विद्या दत्तात्रय जाधव (५५) असे मुख्याध्यापिकेचे नाव असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही़ तर शिक्षण संस्थेच्या एका पदाधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे पती दत्तात्रय जाधव यांनी केला आहे़ आंतर भारती शिक्षण मंडळाच्या तीन प्राथमिक शाळांची बुधवारी वि. स. खांडेकर प्रशालेत कार्यशाळा होती. कार्यशाळेतील वक्त्यांच्या स्वागताची जबाबदारी मुख्याध्यापिका विद्या जाधव यांच्याकडे होती. शाळेत आल्यानंतर वक्त्यांचे त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. त्यानंतर चौगुले विद्यालयाच्या कार्यालयातून पर्स आणण्यासाठी गेल्या. बराच वेळ झाल्याने दोन शिक्षिका व शिपाई त्यांना बोलाविण्यास गेले. चौगले विद्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर जाणार्‍या जिन्याचा दरवाजा खुला असल्याने सर्वजण वर गेले असता आतील वर्गाच्या खोलीमध्ये सिलिंग फॅनला त्या लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या़ कर्मचार्‍यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केल़ेमात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
 

मुख्याध्यापिका विद्या जाधव यांच्या आत्महत्याप्रकरणी संस्थेचा काडीमात्र संबंध नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू असल्याचे कळते. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी़ परंतु त्यांचे पती व काही दुखावलेले शिक्षक विनाकारण संस्थेवर आरोप करत आहेत़
- बाबूराव मुळीक, कार्याध्यक्ष, आंतरभारती शिक्षण मंडळ
 

Web Title: Headmistress's School Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.