हिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 09:22 PM2020-11-18T21:22:02+5:302020-11-18T21:23:27+5:30
Wrestling, kolhapurnews भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र रोहित खंचनाळे यांनी बुधवारी दिली. खंचनाळे हे मागील पाच दिवसांपासून आजारी आहेत. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी पहिला ह्यहिंदकेसरीह्णचा किताब मिळविला होता.
कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र रोहित खंचनाळे यांनी बुधवारी दिली. खंचनाळे हे मागील पाच दिवसांपासून आजारी आहेत. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी पहिला हिंदकेसरीचा किताब मिळविला होता.
खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत.
सध्या खंचनाळे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून महावीर कॉलेजनजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून, औषधोपचारास म्हणावा तितका प्रतिसाद देत नसल्याचेही त्यांचे पुत्र रोहित यांनी सांगितले.