Corona Virus: “हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:36 PM2021-04-20T20:36:39+5:302021-04-20T20:38:59+5:30
Corona Virus: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कळकळीची विनंती केली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक निर्बंध लावले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाकरे सरकारकडून अनेकविध उपाययोजना करताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कळकळीची विनंती केली आहे. कोरोनाची थोडी लक्षण दिसली, तरी तातडीने तपासणी करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. (health minister rajesh tope appeal to people to test corona)
आपण सर्वजण करोनाच्या महामारीशी लढत असल्याने काही महत्वाच्या सूचना मी देऊ इच्छितो. आपल्याला थोडी लक्षणे आढळली तरी चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करा. कोणत्याची परिस्थितीत अंगावर दुखणे अंगावर काढू नये, असा सल्ला टोपे यांनी यावेळी दिला.
केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र
कृपया दुखणे अंगावर काढू नका
जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की, उशीर झाल्याने रुग्ण दगावला, त्यामुळे कृपया दुखणे अंगावर काढू नका, असेही टोपे यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत लसीकरणास महत्व द्या. कोरोना महामारीत सुरक्षित ठेवण्यात लस महत्वाची कामगिरी बजावणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला बीपी, डायबेटीज, किडनी, ह्रद्य काहीही आजार असला तरी लस लाभदायी आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”
राज्य सरकारकडून मिशन ब्रेक द चेन
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन हा कार्यक्रम सुरू केला आहे. अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहेत. त्यांचे पालन झालच पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे, असेही टोपे यांनी नमूद केले.
अनिल अंबानींची 'ही' कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. लसीकरण वाढले की, हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जाऊ शकू, असेही टोपे म्हणाले.