पदभरतीमध्ये घोटाळे करू नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:55 AM2023-09-02T04:55:18+5:302023-09-02T04:55:26+5:30

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आतापासूनच निश्चित करावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.        

Health Minister Tanaji Sawant orders not to do scams in recruitment | पदभरतीमध्ये घोटाळे करू नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश

पदभरतीमध्ये घोटाळे करू नका, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आदेश

googlenewsNext

मुंबई : राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणाअंतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी दिले.

भरतीप्रक्रियेबाबत आयोजित आढावा बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव विजय लहाने, टीसीएस कंपनीचे मयूर घुगे आदी उपस्थित होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागाची ही भरतीप्रक्रिया सर्वांत मोठी आहे. त्यामुळे सुरक्षितपणे भरतीप्रक्रिया राबवावी. कुठलाही गैरप्रकार  या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी १० ते ११ लाख अर्ज येण्याचे लक्षात घेत सर्व्हरची क्षमता ठेवावी, यासाठी कंपनीने आत्ताच नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. सावंत यांनी दिल्या.

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आतापासूनच निश्चित करावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.        

Web Title: Health Minister Tanaji Sawant orders not to do scams in recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.