Health Tips - उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 फायदे

By Admin | Published: April 5, 2017 10:50 AM2017-04-05T10:50:27+5:302017-04-05T10:50:27+5:30

चव व थंडाव्याचा विचार करता उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण मूल्य भरपूर प्रमाणात आहेत.

Health Tips - 5 Benefits of Melon Eating in the Summer | Health Tips - उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 फायदे

Health Tips - उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 फायदे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. चव व थंडाव्याचा विचार करता उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण मूल्य भरपूर प्रमाणात आहेत. खरबूजमध्ये पाण्याशिवाय जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण 95 टक्के असते. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पिकल्यांनंतर काहीसे पिवळे होणारे हे फळ त्याच्या चविष्ट घट्ट गोडसर गरासाठी प्रसिद्ध आहे. या फळाच्या थंडपणाच्या गुणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत करते.

- खरबूजमध्ये असलेले पाण्याचे मोठे प्रमाण शरीरात कधीच अ‍ॅसिडिटी (अपचन) होऊ देत नाही. खरबूजमधील क्षार चयापचय संस्था उत्तम राहते ज्यामुळे पचनसंस्था उत्तम राहते.
- खरबूजमध्ये असलेले कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करते विशेषत: खरबुजातील बिया याबाबत खूपच फायदेशीर ठरल्या आहेत.
- खरबूजमध्ये एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
- खरबुजाचे नियमित सेवन किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषकरून लिंबाच्या रसाबरोबर त्याचे सेवन युरिक अ‍ॅसिडशी संबंधित समस्या दूर करते.
- नितळ कांती (त्वचेसाठी)साठीही खरबूज उपयोगी आहे. खरबूजमध्ये कोलाजेन नावाचे तत्त्व मोठ्या प्रमाणात असते जे त्वचेला सौंदर्य व कांती प्रदान करते. त्यातील पाणी हे त्वचेतील कोरडेपणा नष्ट करते.

Web Title: Health Tips - 5 Benefits of Melon Eating in the Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.