Health Tips - केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By Admin | Published: March 23, 2017 04:57 PM2017-03-23T16:57:57+5:302017-03-23T18:21:28+5:30

आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते

Health Tips - Do you know the benefits of eating bananas? | Health Tips - केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Health Tips - केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते आणि चरबीत रूपांतर होऊ देत नाही. आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे केळी ,आंबा, चिकू,पेरू,द्राक्षे, कलिगंड, सीताफळ,फणस यासारख्यी फळे नियमित खाल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो. केळी खाल्ल्यानंतर होणारे फायदे काय आहेत. हे आपण जाणून घेऊ
 
 
- सकाळी केळी खाल्ल्यास दिवसभरात त्रास देणारी अॅसिडिटी,डोकेदुखी,अपचन व ,ब्लोटिंगपासून आपल्याला आराम मिळू शकतो. 
 
- केळी हे मुळात 'प्रिबायोटिक' असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. 
 
- मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो.जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला 'फ्रुक्टोज' म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते. American Diabetes Association ने सुध्दा केळ्याला मान्यता दिली आहे.
 
- केळी हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.
 
-  केळी आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते.  
 
- केळ्यात असलेला खनिजांचा साठा (Minerals) ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळी खाणं फायद्याचे ठरु शकते. 
 
- केळी हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे.;जे सफरचंदाला जमणार नाही.
 
- दिवसाची सुरुवात केळ्याने केल्याने दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.

Web Title: Health Tips - Do you know the benefits of eating bananas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.