Health Tips - ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

By Admin | Published: March 31, 2017 10:16 AM2017-03-31T10:16:26+5:302017-03-31T10:16:26+5:30

बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे..

Health Tips - These benefits are 12 benefits | Health Tips - ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

Health Tips - ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - एप्रिल सुरु होण्यापूर्वी उन्हाचा वाढता तडाखा, उष्माघाताचा धोका, स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मार्च ते जून या कालावधीत थकवा येणे, ताप येणे, डोके-पोट दुखणे, भूक न लागणे, मानसिक अस्वस्थता अशा अनेक समस्या उद्भवतात.
उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास किंवा डिहायड्रेशन तसेच इतर समस्या टाळण्यासाठी ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे..

ताक पिण्याचे हे आहेत 12 फायदे

- इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचा मुबलक साठा असल्याने ताकामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. तसेच पोटामधील मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करते.
-शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.
- उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच अ‍ॅसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने अ‍ॅसिडिटी बरी होते.
- ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत. अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो.
- ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
- ताकामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होते.
- वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
- दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
- ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
- थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
- रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

Web Title: Health Tips - These benefits are 12 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.