समीर गायकवाडच्या जामिनावर आता २९ मे रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 02:09 AM2017-05-16T02:09:38+5:302017-05-16T02:09:38+5:30
अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले हे रजेवर असल्याने सत्र न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी सुनावणीची पुढील तारीख २९ मे दिली.
दरम्यान, पानसरे हत्येच्या खटल्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षल निंबाळकर यांना सहायक सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे यांची नियुक्ती केल्याचे आदेश शासनातर्फे विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत अॅड. राणे यांनी न्यायालयात सादर केली. समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला होता.