आवाजी मतदानाविरोधात सुनावणी शक्य?

By admin | Published: December 2, 2014 04:35 AM2014-12-02T04:35:35+5:302014-12-02T04:35:35+5:30

बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या प्रस्तावानुसार सभागृह अध्यक्ष यांनी घेतलेल्या आवाजी मतनादाविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते

Hearing against voice vote possible? | आवाजी मतदानाविरोधात सुनावणी शक्य?

आवाजी मतदानाविरोधात सुनावणी शक्य?

Next

मुंबई : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या प्रस्तावानुसार सभागृह अध्यक्ष यांनी घेतलेल्या आवाजी मतनादाविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते का, याचा खुलासा करण्याचे आदेश न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते काँग्रेसचे आमदार नसीम खान यांना सोमवारी दिले़
आवाजी मतदानासाठी भाजपाने सभागृह अध्यक्षांकडे प्रस्ताव सादर केला़ त्यानंतर हे आवाजी मतदान घेतले़ मात्र सरकारचे बहुमत हे सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या संख्याबळावर निर्भर असते, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटल्याकडे खान यांचे वकील देसाई यांनी लक्ष वेधले़

Web Title: Hearing against voice vote possible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.