एकनाथ खडसे यांचीही सुनावणी

By admin | Published: January 6, 2017 03:31 AM2017-01-06T03:31:48+5:302017-01-06T03:31:48+5:30

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलटतपासणीदरम्यान बाजू मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथ

Hearing of Eknath Khadse too | एकनाथ खडसे यांचीही सुनावणी

एकनाथ खडसे यांचीही सुनावणी

Next

नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलटतपासणीदरम्यान बाजू मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना समितीसमोर प्रत्यक्ष हजर रहावे लागणार आहे. चौकशी समितीच्यावतीने तशी नोटीस लवकरच बजावण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीने भोसरीला जाऊन जागेची पाहणी केली. मुंबई मंत्रालयातील उद्योग विभागाकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतचर दोन्ही विभागाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे समितीने मागवून घेतली. आपले मत मांडण्यासाठी खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of Eknath Khadse too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.