नेस्ले हायकोर्टात, मॅगीप्रकरणी आज सुनावणी
By admin | Published: June 12, 2015 04:09 AM2015-06-12T04:09:58+5:302015-06-12T04:09:58+5:30
भारतीय अन्नसुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन(महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्टले कंपनीने उच्च
मुंबई : भारतीय अन्नसुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन(महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्टले कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे.
मॅगीमध्ये अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने व पाकिटांवर ग्राहकांची दिशाभूल करणारे लेबल लावल्याची दखल घेत प्राधिकरणाने मॅगीवर बंदी आणली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही यावर बंदी आणली. कंपनीने मॅगीची विक्री, उत्पादन व वाहतूक बंद करावी, असे आदेश प्राधिकरणाने नेस्टले कंपनीने दिले.
त्याला कंपनीने याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले. सरकारने मॅगीच्या चाचणीसाठी अवलंबलेली प्रक्रिया अयोग्य आहे. कंपनीने केलेल्या चाचणीनुसार मॅगीत शिसेचे अधिक प्रमाण नाही तसेच कंपनीने पाकिटावरही चुकीचा संदेश छापलेला नाही. मॅगीवरील बंदी तत्काळ उठवावी. कारण यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.