पानसरे हत्येप्रकरणी उद्या सुनावणी
By admin | Published: August 3, 2016 05:24 AM2016-08-03T05:24:47+5:302016-08-03T05:24:47+5:30
पानसरे कुटुंबीयांच्यावतीने अॅड. अनिल नेवगी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे द्यावा, या पानसरे कुटुंबीयांच्यावतीने अॅड. अनिल नेवगी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. या सुनावणीच्या निर्णयानंतर ‘एसआयटी’कडे तपास राहिल्यास दुसऱ्या दिवशी डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्याची तयारी केली आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (एसआयटी)चे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दाभोलकर खूनप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेल्या डॉ. तावडे याचे ‘कोल्हापूर कनेक्शन’ तपासात पुढे आले आहे. तो पानसरे हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ असल्याचा पोलिसांना संशय आहे. तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे.