ड्राय डे रद्द करण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 05:36 PM2017-02-16T17:36:33+5:302017-02-16T17:36:33+5:30
निवडणूक काळात मतदानाची पूर्वसंध्या, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि निकालाचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 16 - निवडणूक काळात मतदानाची पूर्वसंध्या, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि निकालाचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये काही जण भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. निकालाच्या दिवशी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. अशावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ड्राय डे असतो.
राज्यातील दारुची सगळी दुकाने बंद असतात. पण आता वरील तिन्ही दिवशी ड्राय डे रद्द करावा अशी काही हॉटेल चालकांची मागणी आहे. 20,21 आणि 23 फेब्रुवारीचा ड्राय डे रद्द करावा या मागणीसाठी ठाण्यातील हॉटेल मालक संघटनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
21 फेब्रुवारीला मुंबईसह दहामहापालिकांसाठी मतदान होणार आहे तर, 23 तारखेला महापालिका आणि जिल्हापरिषदांचा एकत्रित निकाल लागणार आहे. एकूण तीन दिवस असलेला हा ड्राय डे रद्द करावा अशी हॉटेल मालकांची मागणी आहे.