मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी
By admin | Published: April 27, 2017 02:30 AM2017-04-27T02:30:28+5:302017-04-27T02:30:28+5:30
मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी आहे. सरकारी कार्यालयांत तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेली मात्र सध्या रिक्त झालेली १६ टक्के पदे भरण्याचे किंवा भरलेल्या पदांची पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपी मुदतवाढ करून देण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेल्या पदांचा कालावधी आता संपत आल्यामुळे या जागांवर नव्या लोकांची नियुक्ती करण्याची किंवा मुदत वाढवून देण्याची परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
उच्च न्यायालयाने या अर्जावर सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी आहे. (प्रतिनिधी)