सोनई दलित हत्याकांडाची आजपासून सुनावणी
By admin | Published: November 11, 2014 01:30 AM2014-11-11T01:30:23+5:302014-11-11T01:30:23+5:30
सोनई दलित हत्याकांड खटल्याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी होणार आह़े
Next
नाशिक : प्रेमप्रकरणावरून 1 जानेवारी 2क्13 रोजी घडलेल्या नेवासा तालुक्यातील सोनई दलित हत्याकांड खटल्याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी होणार आह़े
सकाळी 11 ऐवजी दुपारी 3 वाजता आरोपींना हजर केल्यामुळे सोमवारी खटल्याची सुनावणी झाली नाही. न्यायालयाने पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली व मंगळवारी वेळेत आरोपी हजर करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती न्यायालयीन सूत्रंनी दिली आह़े खटल्यातील एका आरोपीच्या वकिलाने वकीलपत्र मागे घेतले आह़े
अहमदनगर जिल्ह्यातील गणोशवाडी शिवारातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी सीमा नेवासा फाटय़ावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एड.चे शिक्षण घेत होती़ संस्थेत सफाई कामगार असणा:या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू व सीमा यांची ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल़े त्याची माहिती दरंदले कुटुंबीयांना मिळाली होती. सीमाचे वडील व गुन्ह्यातील आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणोश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कु:हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना 1 जानेवारी 2क्13 रोजी बोलावून घेतले होत़े संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून, पळून जाणा:या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलिसांनी तपासात म्हटले आहे. याप्रकरणी सात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आह़े राज्यभरात गाजलेल्या या दलित हत्याकांड खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड़ उज्ज्वल निकम बाजू मांडत आहेत़ (प्रतिनिधी)