‘त्या’ याचिकांवर ४ जुलैपासून सुनावणी; सोहराबुद्दीन बनावट चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:09 AM2018-06-21T06:09:26+5:302018-06-21T06:09:26+5:30

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्तता करण्यात आलेलया ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या याचिकांवर ४ जुलैपासून उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.

Hearing on 'those' pleas from 4th July; Sohrabuddin Textured Flint | ‘त्या’ याचिकांवर ४ जुलैपासून सुनावणी; सोहराबुद्दीन बनावट चकमक

‘त्या’ याचिकांवर ४ जुलैपासून सुनावणी; सोहराबुद्दीन बनावट चकमक

Next

मुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्तता करण्यात आलेलया ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणा-या याचिकांवर ४ जुलैपासून उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.
आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणाºया तीन याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यातील एक सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन, तर दोन सीबीआयने दाखल केल्या. त्यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना, फेब्रुवारीत अचानक न्यायाधीशांच्या असाइनमेंट बदलण्यात आल्या. त्यामुळे सुनावणी झाली नाही. राजकीय वातावरण तापल्याने, उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी हे कामकाजातले बदल नित्याचे असल्याचे सांगितले. बुधवारी सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने ४ जुलैपासून सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले.
रुबाबुद्दीन शेख याने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा, दिनेश एम. एन., राजकुमार पांडियन यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान दिले. गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी एन. के. आमिन, राजस्थान पोलीस हवालदार दलपत सिंग राठोड यांच्या आरोपमुक्ततेला सीबीआयने आव्हान दिले. डिसेंबर २००५ मध्ये गुजरात व राजस्थान पोलिसांनी सोहराबुद्दीन व त्याच्या पत्नीचा ताबा घेत, त्यांची बनावट चकमकीत हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही राजस्थान पोलिसांनी वर्षानंतर हत्या केली. यात ३८ लोकांना साीबीआयने आरोपी केले. मात्र, मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने १४ जणांची आरोपमुक्तता केली.

Web Title: Hearing on 'those' pleas from 4th July; Sohrabuddin Textured Flint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.